Friday, April 3, 2026
HomeनगरAhilyanagar : कृषी निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता; 11 परवाने निलंबित

Ahilyanagar : कृषी निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता; 11 परवाने निलंबित

जिल्हा कृषी अधिक्षक यांची कारवाई || पाथर्डीतील 3 तर कोपरगावमधील 8 परवान्यांचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा योग्य दरात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत निविष्ठा विक्रीत अनियमितता आणि लिंकींग करणार्‍या पाथर्डीतील 3 व कोपरगावमधील 8 अशा 11 ठिकाणी कृषी विभागाने परवाने निलंबित केले आहेत.

- Advertisement -

रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा योग्य दरामध्ये पुरवठा होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात तालुकास्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथक यांच्यामार्फत तपासणी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. या तपासणी अंती निविष्ठा विक्री केंद्रामध्ये त्रुटी, तसेच नियमबाह्य गोष्टी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलेले आहेत. त्यासोबतच पुर्ण तपासणी करुन विविध निविष्ठांचे नमुने काढणे, खत विक्री व्यवहार नोंदी, ज्यादा दराने खते विक्री, खतांची लिकिंग असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कृषि निविष्ठा विक्री कायदे व नियम नुसार कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

युरीया खताची वाढती मागणी व युरिया विक्रीमध्ये होत असलेल्या गैरप्रकाराच्या तक्रारी कृषि विभागास प्राप्त झालेल्या होत्या. त्या रोखण्यासाठी तसेच ई-पॉसवरील खत साठा व गोदामातील प्रत्यक्ष साठा या तफावत आढळून येत होती. त्यासाठी कृषि विभागाने जिल्हाभरात कृषि सेवा केंद्रांची तपासणी मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात आली. जिल्हाभरात झालेल्या तपासणी मध्ये कृषि निविष्ठा कायदा, अत्यावश्यक अधिनियम तसेच परवाने अटी व नियमानुसार त्रुटी आढळलेल्या पाथर्डी 3, कोपरगाव 8 असे जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्राच्या 11 परवान्यांवर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात संबंधितांची सुनावणी घेऊन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश बजावले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र यांना कृषि निविष्ठा कायद्यांतर्गत असलेले नियम व अटी पाळुन शेतकर्‍यांना त्रास होणार नाही, अशा पध्दतीने कृषि निविष्ठा पुरवठा करावा, असे आवाहन सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केलेले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना युरिया व इतर खतांसोबत लिकिंग अथवा कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 वर, तसेच 9822446655 यानंबर वर तक्रार नोंदवावी.
– सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

ताज्या बातम्या

Shirdi : खरातच्या पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी...