राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1075 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 रुपये ते 255 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.
पेरूची 6 कॅरेट आवक झाली. पेरुला (Guava) किमान 12.50 रुपये तर जास्तीत 27.50 रुपये, तर सरासरी 20 रुपये. कैरीच्या 19 क्रेटस् ची आवक झाली. कैरीला 15 ते 30 रुपये तर सरासरी 22.50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.
सोयाबीन (Soybean) 1 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybean) सरासरी 6770 रुपये भाव मिळाला. गव्हाची 14 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2200 रुपये, जास्तीत जास्त 2381 रुपये तर सरासरी 2290 रुपये भाव मिळाला. मका सरासरी 1900 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




