Thursday, May 2, 2024
Homeनगरपावसाच्या आगमनानुसारच करा पेरणीचे नियोजन

पावसाच्या आगमनानुसारच करा पेरणीचे नियोजन

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे. ज्या भागात पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पेरण्या झालेल्या नाहीत अशा शेतकर्‍यांनी इथून पुढे होणार्‍या पावसाच्या आगमनानुसारच पीक पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन दहिगावने कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्या विशेषज्ञ नारायण निबे यांनी केले.

- Advertisement -

असे करावे पेरणीचे नियोजन…

1 जुलै ते 15 जुलैपर्यंत पाऊस झाल्यास..

सोयाबीन, कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तूर, सूर्यफूल, घेवडा (वरुण), तीळ इ. पिकांची पेरणी करावी. आंतरपीक – बाजरी + तूर (2:1), गवार + तूर (2:1) अवलंब करावा. कांदा (खरीप) रोपवाटिका तयार करावी. टीप : तूर पिकाच्या विपुला वाणाची (145 दिवस) निवड करावी. येत्या काळात मूग, उडीद, चवळी, मटकी या पिकांची पेरणी करू नये.

16 जुलै ते 31 जुलैपर्यंत पाऊस झाल्यास…

सूर्यफूल, तूर, हुलगा, एरंडी, बाजरी, तीळ इ. पिकांची पेरणी करावी. आंतरपीक : सुर्यफूल+तूर (2:1) अवलंब करावा. तसेच कांदा (खरीप) रोपवाटिका तयार करावी.

1 ते 15 ऑगस्टपर्यंत पाऊस झाल्यास…

सुर्यफूल, तूर, एरंडी, हुलगा, तीळ इ. पिकांची पेरणी करावी. आंतरपीक सुर्यफूल + तूर (2:1) तसेच कांदा (रांगडा) रोपवाटिका तयार करावी.

16 ते 31 ऑगस्टपर्यंत पाऊस झाल्यास…

सुर्यफूल, तूर, एरंडी इ. पिकांची पेरणी करावी, तसेच कांदा (रांगडा) लागवड करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, दहिगावने येथील शास्रज्ञांशी संपर्क करण्याचे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या