Friday, May 3, 2024
Homeनाशिककृषी विभागतर्फे कृषी माल निर्यात सप्ताहाचे आयोजन

कृषी विभागतर्फे कृषी माल निर्यात सप्ताहाचे आयोजन

ननाशी। वार्ताहर Nanashi

महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) कृषी विभागाच्या (Department of Agriculture) वतीने कृषि माल निर्यात सप्ताहांतर्गत (Agricultural Product Export Weeks) दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) तळ्याचापाडा, चाचडगाव, जांबुटके आदी गावात विविध कार्यक्रम राबविण्यात करण्यात आले.

- Advertisement -

या सप्ताहांतर्गत तळ्याचापाडा येथे भात (Rice), टोमॅटो (Tomato) व भाजीपाला (Vegetables) पिकांचे सेंद्रिय व निर्यातक्षम उत्पादन (Organic and exportable), कीड रोग नियंत्रण (Pest disease control) या विषयी शेतकर्‍यांची कार्यशाळा (Workshop For Farmers) घेण्यात आली.

या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंतचे (Regional Agricultural Research Center Pimpalgaon Baswant) डॉ. राकेश सोनवणे (Dr. Rakesh Sonawane) उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी आत्मा संस्था नाशिकचे (Atma Sanstha Nashik) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम (Project Director Rajendra Nikam) होते .

या कार्यशाळेत भात टोमॅटो व इतर भाजीपाला पिकावरील कीड रोग नियंत्रणाबाबत डॉ. राकेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. सेंद्रिय उत्पादन (Organic production), कृषिमाल निर्यात, शेतकरी बचत गटांची स्थापना (Establishment of Farmers Self Help Groups), शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कृषी निविष्ठा खरेदी याविषयी राजेंद्र निकम यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी ई -पीक पाहणी (E-Crop Survey), महाडीबीटी, प्रधानमंत्री कृषी अन्न प्रक्रिया उद्योग नागली उत्पादन याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमास माजी पं. स. सदस्य गोपिनाथ गांगोडे, पं. स. सदस्य एकनाथ गायकवाड, सरपंच देविदास गांगुर्डे, गांडोळेचे माजी सरपंच सुरेश भोये, ग्रामसेवक अनंत जेट्टे आदीसह शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक संजय सावंत यांनी केले तर मंडळ कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक महेंद्र गवळी, योगेश जोपळे, भाऊसाहेब वाघमोडे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या