Saturday, September 5, 2026
HomeनगरCrime News : जागेच्या वादातून दरेवाडीत दोन गटांत हाणामारी; सात जण जखमी

Crime News : जागेच्या वादातून दरेवाडीत दोन गटांत हाणामारी; सात जण जखमी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

शहरालगतच्या दरेवाडी (ता. अहिल्यानगर) येथील बडेकर वस्ती भागात जागेच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादींवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील 10 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरेवाडी परिसरातील बडेकर वस्ती येथे जागेच्या मालकीवरून दोन गटांत काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद गुरूवारी (12 मार्च) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास विकोपाला गेला. यावेळी दोन्ही गटातील काही जण एकमेकांसमोर येत शिवीगाळ व दमदाटी करू लागले. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन्ही गटाचे सात जण जखमी झाले आहेत.

प्रतिज्ञा विश्‍वास बडेकर (वय 28) यांच्या जबाबावरून सिध्दार्थ बन्सी बडेकर, शितल संदीप गायकवाड (दोघे रा. बडेकर वस्ती, दरेवाडी), निकीता वैभव भिंगारदिवे, वैभव मार्शल भिंगारदिवे (दोघे रा. सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात फिर्यादी प्रतिज्ञा बडेकर, विश्‍वास बडेकर, अतुल बडेकर, संजय बडेकर हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार एन. एम. पठारे करीत आहेत.

शांताबाई सिताराम बडेकर (वय 75) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्‍वास माणिक बडेकर, प्रतिज्ञा विश्‍वास बडेकर, आतुल संजय बडेकर, आशा संजय बडेकर, संदीप सोनवणे, बंटी संदीप सोनवणे (सर्व रा. बडेकर वस्ती, दरेवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी केलेल्या मारहाणीत फिर्यादी शांताबाई बडेकर, मृलाण बडेकर व जितेंद्र देठे हे जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...