Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar garbage issue : कचर्‍याच्या दुर्गंधीने बेजार नागरिकांचा संताप उफाळला

Ahilyanagar garbage issue : कचर्‍याच्या दुर्गंधीने बेजार नागरिकांचा संताप उफाळला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

शहरातील कचरा संकलन केंद्र हालवून कायनेटिक चौक परिसरातील सीडी देशमुख लॉ कॉलेज व साबळे-वाघिरे विडी कंपनीच्या पाठीमागे स्थलांतरित करण्यात आले असून, त्यामुळे या भागातील रहिवासी आणि विडी कामगार महिलांवर आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी आता अहिल्यानगर-पुणे महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेने कोणतीही ना-हरकत न घेता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांशी कोणताही विचारविनिमय न करता हे कचरा संकलन केंद्र स्थलांतरित केले. या भागात सीडी देशमुख लॉ कॉलेज, विडी कंपनीतील महिलांचा मोठा वर्ग तसेच घनदाट वसाहती असून, संकलन केंद्रामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी, घाणी आणि साथीच्या आजारांमुळे परिसरात गंभीर आरोग्य संकट निर्माण झाले आहे. कचरा संकलन गाड्या दिवसभरात संपूर्ण शहरातील कचरा गोळा करून या ठिकाणी अनिर्बंधरितरीत्या डंप करत आहेत. यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया, ताप, श्‍वसनविकार यासारख्या आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही महिला उलटी-मळमळ, श्‍वास घ्यायला त्रास अशा तक्रारी घेऊन दवाखान्यांत धाव घेत आहेत. दुर्गंधीपासून बचावासाठी महिलांना नाक दाबून काम करावे लागत असून, धूप व अगरबत्त्या लावून काम चालवले जाते, ज्यामुळे अनेक महिलांना ऍलर्जी आणि इतर त्रास होत आहे.

YouTube video player

कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे महिलांना कंपनीमध्ये संपूर्ण दिवस काम करणे कठीण झाले आहे. परिणामी त्यांचा मासिक पगार कमी झाला असून, घरखर्च, कर्जहप्ते आणि औषधांच्या खर्चाची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. या समस्येकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक माजी नगरसेवक दीपक खैरे यांनी घटनास्थळी भेट देऊन विडी कामगार महिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तातडीने संकलन केंद्र हटवण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...