Tuesday, March 25, 2025
Homeनगरअहिल्यानगरचे पालकमंत्रीपद पुन्हा विखेंकडे !

अहिल्यानगरचे पालकमंत्रीपद पुन्हा विखेंकडे !

बीडचे पालकमंत्रीपद 'या' नेत्याकडे?

मुंबई | Mumbai

पालकमंत्र्यांची यादी सरकारकडीन जाहीर करण्यात आली असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं असून त्यांच्यासाठी हा धक्का आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेत मंत्रिमंडळातील सदस्यांना आव्हान स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे, पंकजा मुंडे यांच्याकडे जालना, हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम, गिरीष महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कायम राहिले आहे. आधीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच होते.

राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत.

पालकमंत्री यादी
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस, ठाणे – एकनाथ शिंदे, पुणे व बीड – अजित पवार, अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील, नागपूर व अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे, सिंधुदुर्ग- नितेश राणे, वाशिम – हसन मुश्रीफ, सांगली – चंद्रकांत पाटील, सातारा -शंभुराजे देसाई, जालना – पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट, जळगाव – गुलाबराव पाटील, यवतमाळ – संजय राठोड, कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, अकोला – आकाश फुंडकर, भंडारा – संजय सावकारे, बुलढाणा – मकरंद जाधव, चंद्रपूर – अशोक ऊईके, धाराशीव – प्रताप सरनाईक, धुळे – जयकुमार रावल, गोंदिया – बाबासाहेब पाटील, हिंगोली – नरहरी झिरवळ, लातूर – शिवेंद्रसिंग भोसले, मुंबई शहर – एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर -आशिष शेलार व सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नांदेड – अतुल सावे, नंदुरबार – माणिकराव कोकाटे, नाशिक – गिरीष महाजन, पालघर – गणेश नाईक, परभणी – मेघना बोर्डीकर, रायगड – अदिती तटकरे, रत्नागिरी – उदय सामंत, सोलापूर – जयकुमार गोरे, वर्धा – पंकज भोयर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...