Thursday, March 13, 2025
Homeनगरअतिक्रमणावर महिनाभर चालणार हातोडा

अतिक्रमणावर महिनाभर चालणार हातोडा

महानगरपालिकेचा प्लॅन तयार || अडथळा आणल्यास फौजदारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शहरात व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एक महिन्याच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

शहरात अतिक्रमणांमुळे रस्त्यावर रहदारीला अडथळा होत आहे. विशेषतः मध्यवर्ती शहरात बाजारपेठ व इतर प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होत आहेत. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा केली जात असल्याने आता अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एक महिनाभर विविध भागात ही कारवाई केली जाणार आहे. कारवाईत कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी दिला आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाकडून 10 फेब्रुवारीपासून कारवाई सुरू असून 13 फेब्रुवारी रोजी माणिक चौक-भिंगारवाला चौक-एम.जी. रोड, शहाजीरोड, नविपेठ-बँक रोड-लक्ष्मीबाई कारंजा- गांधी मैदान- चितळे रोड, 14 फेब्रुवारी रोजी दाळमंडई-आडतेबाजार-तेलीखुंट-चितळेरोड-नेहरू मार्केट-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट, 17 फेब्रुवारी रोजी जुना दाणे डबरा-मंगलगेट परिसर-राज चेंबर-कोठला परिसर-एस.टी.वर्कशॉप-रामवाडी, 18 फेब्रुवारी रोजी सर्जेपुरा चौक-रंगभवन-लालटाकी परिसर- सिव्हील हॉस्पिटल, 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीगेट-सिध्दीबाग-बालिकाश्रमरोड-सावेडीगांव, 21 फेब्रुवारी रोजी टी.व्ही. सेंटर-प्रोफेसर कॉलनी-भिस्तबागरोड-भिस्तबागचौक- पाईपलाईनरोड-श्रीरामचौक-शिलाविहार – गुलमोहर रोड पोलीस चौकी – पारिजात चौक-गुलमोहररोड ते भिस्तबाग रोड, 24 फेब्रुवारी रोजी पत्रकारचौक-मनमाड रोड-नागापुर-मनपा हद्दी पर्यंत, 25 फेब्रुवारी रोजी हॉटेल चैतन्य क्लासिक-काकासाहेब म्हस्के कॉलेज ते गांधीनगर, 27 फेब्रुवारी रोजी पाईपलाईनरोड-डी मार्ट-बंधनलॉन-आठरे पाटील स्कूल तपोवनरोड-भिस्तबाग महाल-नानाचौक-ढवणवस्ती ते जुना पिंपळगांवरोड, 28 फेब्रुवारी रोजी कोठला स्टॅण्ड-डी.एस.पी चौक-छत्रपती संभाजी महाराज रोड-वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेलपर्यंत, 3 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड-फरिस्ट ऑफिस ते बडी मस्जीद-पाण्याची टाकी ते मेराज मस्जीद ते राजनगर, गाडे शाळा- टॉपअप पेट्रोल पंप, 4 मार्च रोजी कोठला स्टॅण्ड – जीपीओचौक – चांदणी चौक – कोठी चौक-मार्केट यार्ड चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक – सक्करचौक-कायनेटीक चौक, 5 मार्च रोजी सक्कर चौक – मल्हार चौक – रेल्वे स्टेशन परिसर – कायनेटीक चौक, 6 मार्च रोजी कायनेटीक चौक- केडगाव -अंबिकानगर बस स्टॉप व केडगाव परिसर, 7 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-चाणक्य चौक-बुरूडगावरोड-यश पैलेश हॉटेल-आनंदऋषी हॉस्पिटल-चाणक्य चौक-महात्मा फुले चौक ते कोठी, 10 मार्च रोजी सक्कर चौक-टिळकरोड-आयुर्वेद कॉलेज – अमरधाम – नेप्तीनाका – कल्याणरोड – रेल्वे उड्डाणपूल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

जप्त साहित्य परत मिळणार नाही
या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य, टपर्‍या, हातगाड्या, फलक व इतर कोणतेही साहित्य यापुढे कोणाही अतिक्रमण धारकाला परत केले जाणार नाही. वारंवार कारवाई करून दंड आकारून सोडण्यात आलेल्या टपर्‍या, हातगाड्या पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव महानगरपालिकेला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...