Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर 'कनेक्टिंग लिंक', मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे मिसिंग...

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे लोकापर्ण, काय आहे वैशिष्टै?

पुणे | Pune
मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या मिसींग लिंकमुळे हजारो प्रवाशांचा मुंबई पुणे प्रवास सुखकर होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी या मिसिंग लिंकमुळे कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत हा मार्ग खुला करण्यात आला आहे. यावेळी या नवीन मार्गावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत प्रवासाचा आनंद लुटला. आता हा प्रकल्प मिसिंग लिंक नसून, कनेक्टिंग लिंक आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

मिसिंग लिंक पेक्षा कनेक्टिंग लिंक
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीत स्वार झाले होते. विशेष म्हणजे, ‘मिसिंग लिंक’वर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत हा मार्ग प्रवासासाठी खुला केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या कामाची आणि बोगद्यांमधील अद्ययावत यंत्रणेची पाहणीही केली. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याला मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक असे नाव द्यावे, असे आवाहन केले. कारण, हा मार्ग सुरू झाल्याने Nothing is Missing मत व्यक्त करत फडणवीसांनी लवकरच या मार्गाला कोणाचे नाव द्यायचे, ते चर्चा करून ठरवू, असे म्हटले.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण एक स्वप्न आम्ही सर्वांनी मुंबई – पुणे, पुणे – मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता पाहिले होते. त्याचा आज महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पहिल्यांदा तर आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटले पाहिजे. ज्यावेळी हे आपण तयार केले, तेव्हा ही लिंक नव्हती. म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होते. परंतु, आता गायकवाड यांनी समोरचे नाव बदलावे आणि त्याला कनेक्टिंग लिंक लिहावे. लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचे आहे? हे ठरवणार आहोत. परंतु, तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही. नथिंग इज मिसिंग, इव्हरिथिंग इज इन प्लेस असे म्हणत फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; मुदतीअखेर इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या पात्र, पण…

नुकतच मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वाईडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे. जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. खरं म्हणजे आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे सहा किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी कमी झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असून यामुळे खोपोली एक्झिट पासन सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत अशा प्रकारचा हा बोगदात या ठिकाणी तयार करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

प्रकल्पाचे महत्व
आज झालेल्या या लोकार्पणानंतर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासातील वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. घाटातील अवघड वळणे आणि चढ-उतार टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
या मिसिंग लिंकच्या लोकार्पणाआधीच या प्रकल्पातील बोगद्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तब्बल 23.5 मीटर रुंदीच्या या बोगद्याला जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बोगद्याची नोंद झाली आहे. या सोहळ्यात याचं प्रमाणपत्रही देण्यात आले.

महाराष्ट्रातील आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट
10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. 70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.

लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले.

मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा तब्बल अर्धा ते एक तासाचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद होणार आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...