Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar Municipal Corporation Election : पुरुष की महिला? अहिल्यानगरमध्ये कोणाचे मतदान जास्त?...

Ahilyanagar Municipal Corporation Election : पुरुष की महिला? अहिल्यानगरमध्ये कोणाचे मतदान जास्त? वाचा ताजी आकडेवारी

अहिल्यानगर । प्रतिनिधी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरात दुपारपर्यंत मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला असून, दुपारी ३:३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सकाळी ७:३० ते दुपारी ३:३० या वेळेत एकूण १,४८,८५८ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये ७७,६९५ पुरुष आणि ७१,१३३ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच इतर ३० मतदारांनीही मतदान केले. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद असला तरी दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

YouTube video player

मतदानाची सविस्तर आकडेवारी (दुपारी ३:३० पर्यंत)

  • पुरुष मतदार: ७७,६९५
  • महिला मतदार: ७१,१३३
  • इतर: ३०
  • एकूण मतदान: १,४८,८५८
  • टक्केवारी: ४८.४९%

सावेडीत बनावट ओळखपत्रांचा प्रकार उघड

मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना सावेडी भागातील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर एक धक्कादायक प्रकार समोर आला. बनावट मतदार ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या तरुणांकडे संशयास्पद कागदपत्रे आढळल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दोन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकारानंतर शहरातील सर्वच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, ओळखपत्रांची कडक तपासणी केली जात आहे. प्रशासनाने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांततेत मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...