Monday, May 4, 2026
Homeनगरअहिल्यानगर-सोलापुर महामार्गावर अपघात; दोन युवक ठार

अहिल्यानगर-सोलापुर महामार्गावर अपघात; दोन युवक ठार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर (Ahilyanagar Solapur Highway) कर्जत (Karjat) तालुक्यातील माहीजळगाव येथे भीषण अपघातात (Accident) परांडा येथील दोन युवक सोमनाथ दत्तात्रय कदम (वय 24) व शिवाजी बबन कदम (वय 35 दोघेही रा. कोकरवाडी ता. परंडा जि. धाराशिव) हे ठार (Death) झाले आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, आज (मंगळवार) दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सोमनाथ कदम व शिवाजी कदम हे दोघे कामानिमित्त कोकरवाडी (ता. परंडा) येथून करमाळा मार्गाने मोटारसायकलवरून (क्र. एम एच 45 आर 9718) मिरजगावच्या (Mahijalgav) दिशेने येत असतांना अज्ञात वाहनाने समोरासमोर जोराची धडक (Hit) दिली. या अपघातात सोमनाथ दत्तात्रय कदम यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर शिवाजी बबन कदम यांचा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय कासार हे तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...