Friday, November 22, 2024
HomeनगरAhmednagar Water Storage : गाळमुक्तमुळे वाढला 1 हजार 350 टीसीएम पाणी साठा

Ahmednagar Water Storage : गाळमुक्तमुळे वाढला 1 हजार 350 टीसीएम पाणी साठा

अहमदनगर | प्रतिनिधी

धरण आणि तलावांच्या साठवण क्षमतेमध्ये गाळ साठल्याने झालेली घट कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना पुन्हा राबवण्यात येत आहे.

- Advertisement -

यामुळे तलावांची आणि धरणांची मूळ साठवण क्षमता पुन:प्रस्थापित होत असून जिल्ह्यात यंदा सेवाभावी संस्थांमार्फत 73 कामे पूर्ण करण्यात आली असून तब्बल 13 लाख 50 हजार 852 घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला.

यामुळे 1350.85 टीसीएम (सहस्त्र घनफूट) पाणी साठा वाढला आहे. दरम्यान, या योजनेत सहभागी होणार्‍या अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना सरकारच्यावतीने अनुदान देण्यात येणार आहे.

हे हि वाचा : Ahmednagar Politics : जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर

ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शेतकर्‍यांच्या हिताची असून शेत जमिनीला नवसंजीवनी देणारी आहे. यामुळे धरणाच्या साठवण क्षमता पुनर्स्थापित होऊन शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे महत्त्व पाहता ही योजना जोमाने राबविण्यासाठी सरकारकडून यंत्रसामग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येणार आहे. अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी 35.75 घनमीटरप्रमाणे एकरी 15 हजारांच्या मर्यादेत शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येणार आहे.

हे हि वाचा : Kopergoan Crime : गोळीबाराने कोपरगाव हादरले! भरदिवसा झाडल्या गोळ्या, एक गंभीर…

यंदा प्रशासनाच्या वतीने 107 कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी 114 कामे पूर्ण झाली असून 13 लाख 50 हजार 853 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे सिंचनासाठी 1350. 85 टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. ही सर्व कामे अशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली आहेत. त्यात टाटा मोटर्स तर्फे नाम फांउडेशन या संस्थेने सर्वाधिक 92 कामे सुरू केली होती. तर मॉडेल अक्शन फोर रुरल संस्थेची 4, लोकपंचायततर्फे 2 तर ग्रामपंचायत जांभळीमार्फत 1 कामे प्रसताविकत होते.

पण ते काम झाले नाही. या संस्थांमार्फत गाळ काढण्याचे कामे करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 2013 मध्ये या योजनेतून 77 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 32 कामे पूर्ण झाली. तर 43 कामे अजूनही अपूर्ण आहेत. या 32 कामांमुळे 2 लाख 90 हजार 580 घनमीटर गाळ काढण्यात आला होता. त्यातून 290. 58 टीसीएम पाणीसाठा वाढला होता.

हे हि वाचा : Ahmednagar Crime News : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी…

ही कामे जलसंधारण, जिल्हा परिषद, व लोकसहभागातून करण्यात आली होती. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये सेवाभावी संस्थांच्या पुढकारातून करण्यात आल्याने गाळ देखील मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला व पाणी साठा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या