Thursday, May 2, 2024
Homeनगरउगाच गेट वाजवू नका... उपमहापौरांच्या कानपिचक्या कोणाला?

उगाच गेट वाजवू नका… उपमहापौरांच्या कानपिचक्या कोणाला?

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

दक्षता पथकाने (Dakshta Pathak) नागरिकांमध्ये करोनाची जनजागृती (Corona awareness) करणे अपेक्षती आहे. वसुली व दंड (Recovery and penalty) करून पैसे गोळा करणे हा पथकाचा उद्देश नाही. त्यामुळे बंद असतांना दुकानांचे गेट वाजवून त्रास देवू नका. संयमाने वागा, अशा कानपिचक्या उपमहापौर गणेश भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale) यांनी मनपा (AMC) दक्षता पथकास दिल्या.

- Advertisement -

महापालिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाने सामाजिक संघटनाही संतप्त

करोना संकटामुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत आहे. अर्थचक्र थांबले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या दक्षता पथकाकडून व्यावसायिकांना व उद्योजकांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. व्यापारी व व्यवसायिकांच्या तक्रारीनंतर उपमहापौर गणेश भोसले यांनी तातडीने मनपा करोना दक्षता पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठकी घेतली.

नागरिकांमध्ये करोना निर्बंधांची जनजागृती करण्यासाठी पथके आहेत. वसुली व दंड किंवा पैसे गोळा करणे हा पथकांचा उद्देश नाही. गर्दीच्या ठिकाणी करोना निर्बंधांची जनजागृती अपेक्षीत आहे. त्यामुळे दुकाने बंद असतांना दुकानाचे गेट वाजवू नका. व्यापारी हवालदिल असताना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना त्रास देणे योग्य नाही. त्यांना समजावून सांगणे हे आपले काम आहे, अशा सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा दक्षता पथकास दिल्या. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, यंत्र अभियंता परिमल निकम, दक्षता प्रमुख शशिकांत नजन, जितेंद्र सारसर, नाना गोसावी, राहुल साबळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या