Friday, May 3, 2024
Homeनगरदुरूस्ती करता की रस्त्यावर उतरू?

दुरूस्ती करता की रस्त्यावर उतरू?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील काही दिवसापासून शहरातील अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. शहरात होणारी रस्त्याची तात्पुरती डागडुजीकरण न करता पूर्णपणे नव्याने करण्यात यावे. 15 दिवसांत कामे हाती घ्यावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने महापालिका प्रशासनाला दिला आहे.

- Advertisement -

मांडओहोळ गोळीबारातील ‘त्या’ जखमी अभियंत्याचा अखेर मृत्यू

शहरातील रस्त्याची दुरावस्थेबाबत महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांना शिवसेननेने निवेदन दिले. यावेळी शहरप्रमुख माजी नगरसेवक दिलीप सातपुते, बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे, अमोल हुंबे, काका शेळके, मदन आढाव, चंद्रकांत उजागरे, अभिषेक भोसले, संजय छजलानी, रवींद्र लाल बोंद्रे, सुनील लाल बोंद्रे, प्रशांत डावरे, मुकेश जोशी, ओमकार जाधव, विशाल गायकवाड, सागर वाळके, लखन केसळकर, प्रेम शिंदे अभिषेक गायकवाड, तुषार शिंदे, ओमकार कांबळे, तारीक कुरेशी आदी उपस्थित होते.

बिबट्याचा कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर हल्ला

मागील काही दिवसापासून शहरातील अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. नागरिकांना विविध मणक्याचे, कंबरेचे आजार तसेच धुळ उडून श्वसनाचे आजार या त्रासास सामोरे जावे लागत आहे. शहरात होणारी रस्त्याची तात्पुरती डागडुजीकरण न करता पूर्णपणे नव्याने करण्यात यावे. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मंजुर असलेल्या रस्त्यांसाठी कमी पडणार्‍या निधीची तातडीने व्यवस्था करावी जेणे करून शहर पेंचिंग करण्याऐवजी शहरातील नवीन रस्ते होतील.

घरात सुरू होता जुगाराचा डाव; पोलिसांनी मारला छापा

रस्ता दुरुस्तीसाठी आलेला निधी योग्य नियोजन व व्यवस्थापन करून शहरातील उपनगरे, सावेडी, केडगाव येथील रस्ते दुरुस्ती करावी. रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. अनेक अपघात होऊन जीवन भर अंपगत्व तसेच काहीनी आपले प्राण गमावले आहेत. हा विषय गांभीर्याने घेऊन 15 दिवसांत कामे हाती घ्यावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू या सर्व जबाबदारी महानगरपालिकेची राहील असे यावेळी सांगितले.

अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून घोषणांचा महापूर

- Advertisment -

ताज्या बातम्या