Wednesday, May 15, 2024
Homeनगरनगर..थंडाथंडा कूल कूल !

नगर..थंडाथंडा कूल कूल !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या 2 दिवसात नगरच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे नगरकरांना हुडहुडी भरलेली आहे. बुधवारी तर दिवसा आणि रात्रीही थंडी होती. शिवाय जोडीला गार वारा होता. अधूनमधून आभाळ आलेले होते. त्यामुळे स्वेटर्स, कानटोप्या, घोंगड्या, ब्लँकेट्सची आता गरज भासू लागली आहे. या थंडीमुळे जनजीवनावरही परिणाम झाला आहे.

- Advertisement -

नवीन वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात हुडहुडी भरणारी थंडी जाणवली. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तरी येणारे पुढील दोन आठवडे थंडीचा जोर कायम असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 32.1 (12.5), जळगाव 29 (9.8), धुळे 28 (7.8), कोल्हापूर 30.6 (19.5), महाबळेश्वर 28.7 (14.1), नाशिक 30.2 (10.6), निफाड 27.4 (8.4), सांगली 31 (18.1), सातारा 31.6 (14.9), सोलापूर 33.7 (20.1), सांताक्रूझ 32.4 (16.6), डहाणू 28.3 (16), रत्नागिरी 31.7 (19.1), औरंगाबाद 30 (10.6), नांदेड 30.8 (17.8), उस्मानाबाद – (15), परभणी 30.7(17), अकोला 30.8 (14.9), अमरावती 31 (14.03), बुलडाणा 29 (14.5), ब्रह्मपुरी 29.8 (15.2), चंद्रपूर 28.2 (17.4), गडचिरोली 29 (13), गोंदिया 28 (12.1), नागपूर 28.4 (13.2), वर्धा 28.2 (14.5), यवतमाळ 28.5 (16.0).

- Advertisment -

ताज्या बातम्या