Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्ह्यात 307 रुग्णांना डिस्चार्ज तर 195 बाधितांची वाढ

जिल्ह्यात 307 रुग्णांना डिस्चार्ज तर 195 बाधितांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 307 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 63 हजार 612 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.38 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 195 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1415 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 52, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 48, आणि अँटीजेन चाचणीत 95 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 25, अकोले 01,जामखेड 01, कर्जत 02, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 08, पारनेर 01, राहाता 03, राहुरी 02,संगमनेर 07, शेवगाव 01, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 14, अकोले 03, जामखेड 01, कर्जत 01, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 06, पारनेर 02, राहाता 03, राहुरी 02, संगमनेर 07, शेवगाव 01, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 95 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 06, अकोले 01, जामखेड 02, कर्जत 13, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 01, नेवासा 05, पारनेर 07, पाथर्डी 16, राहाता 11, राहुरी 03, संगमनेर 16, शेवगाव 02, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 49, अकोले 16, जामखेड 10, कर्जत 10, कोपरगाव 43, नगर ग्रामीण 13, नेवासा 18, पारनेर 09, पाथर्डी 21, राहाता 14, राहुरी 10, संगमनेर 45, शेवगाव 16, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 13, कॅन्टोन्मेंट 03, मिलिटरी हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 63612

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 1415

* मृत्यू : 974

* एकूण रूग्ण संख्या : 66001

- Advertisment -

ताज्या बातम्या