Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात 553 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर

नगर जिल्ह्यात 553 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 518 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 36 हजार 675 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.41 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 553 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4600 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 103, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 176 आणि अँटीजेन चाचणीत 274 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 47, अकोले 03, जामखेड 02, कर्जत 01, नगर ग्रामीण 09, नेवासा 01, पाथर्डी 03, राहुरी 02, संगमनेर 01, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 06, मिलिटरी हॉस्पिटल 14 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 176 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 52, अकोले 01, जामखेड 04, कर्जत 04, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 17, नेवासा 15, पारनेर 11, पाथर्डी 03, राहाता 12, राहुरी 13, संगमनेर 05, शेवगाव 04, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 23 आणि कॅन्टोन्मेंट 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 274 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 23, अकोले 28, जामखेड 17, कर्जत 28, कोपरगाव 20, नगर ग्रामीण 20, नेवासा 15, पारनेर 04, पाथर्डी 22, राहाता 21, राहुरी 02, संगमनेर 38, शेवगाव 20, श्रीगोंदा 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 518 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 101, अकोले 03, जामखेड 44, कर्जत 21, कोपरगाव 37, नगर ग्रामीण 45, नेवासा 44, पारनेर 35, पाथर्डी 06, राहाता 28, राहुरी 34, संगमनेर 42, शेवगाव 03, श्रीगोंदा 13 आणि श्रीरामपूर 62 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 36675

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 4600

* मृत्यू : 684

* एकूण रूग्ण संख्या : 41959

- Advertisment -

ताज्या बातम्या