Thursday, May 2, 2024
Homeनगर131 नवे करोना रुग्ण वाढले

131 नवे करोना रुग्ण वाढले

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात सोमवारी 86 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 68 हजार 941 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 97.15 टक्के झाले आहे. दरम्यान, सोमवारी नव्याने 131 करोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 943 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 58, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 40 आणि अँटीजेन चाचणीत 33 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 26, कर्जत 5, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 2, नेवासा 2, पारनेर 1, पाथर्डी 6, राहता 3, संगमनेर 6, शेवगाव 2, श्रीगोंदा 3 आणि मिलिटरी हॉस्पिटल 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 13, अकोले 1, जामखेड 1, नगर ग्रामीण 9, नेवासा 1, पारनेर 1, राहाता 4, संगमनेर 1, शेवगाव 2, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 2 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 33 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 2, जामखेड 5, कर्जत 4, नगर ग्रामीण 4, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 4, राहता 1, राहुरी 2, शेवगाव 6 आणि श्रीरामपूर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या