Thursday, May 2, 2024
Homeनगरजिल्ह्यात करोना पुन्हा वाढतोय? 24 तासात 129 करोनाग्रस्त

जिल्ह्यात करोना पुन्हा वाढतोय? 24 तासात 129 करोनाग्रस्त

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येने पुन्हा शंभर ओलांडली असून गेल्या 24 तासात 129 नवी करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

यात सर्वाधिक 25 रूग्ण नगर शहरात असून अकोले, जामखेड व कोपरगावमध्ये एकही रुग्ण नाही. तर भिंगार 14, पारनेर 13, श्रीगोंदा 12, नगर तालुका, संगमनेरमध्ये 11 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 15 दिवसांपासून हळूहळू करोना आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. नगर शहरास ग्रामीण भागातून देखील आता करोनाचे नवी रुग्णसमोर येत आहे. जिल्ह्यात करोना लसीकरणाची टक्केवारी चांगली असली तरी करोनाचा एकी डोस न घेतलेल्यांची संख्या मोठी आहे.

केंद्र सरकारने करोना लसीच्या बुस्ट डोसला परवानगी दिल्यानंतर देखील वेगाने लसीकरण होतांना दिसत नाही. लसीकरणाला नागरिकांनी प्रतिसाद देवून सहकार्य करावे, असे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.

असे आहेत नवे रुग्ण

मनपा 25, भिंगार 14, पारनेर 13, नगर ग्रामीण 11, संगमनेर 11, श्रीगोंदा 12, राहाता 8, शेवगाव 8, राहुरी 7, अन्य जिल्हा 4, पाथर्डी 4, श्रीरामपूर 4, कर्जत 3, नेवासा 3, लष्कार रुग्णालय 1, अन्य राज्य 1 एकूण 129

- Advertisment -

ताज्या बातम्या