Friday, May 3, 2024
Homeनगरसासरच्यांनी छळले, विवाहितेने जीवन संपविले

सासरच्यांनी छळले, विवाहितेने जीवन संपविले

अहमदनगर (प्रतिनिधी)

विवाहितेला सासरच्यांनी शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिमानी विरेंद्र शेकटकर (रा. चितळे रोड, नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

- Advertisement -

याप्रकरणी मयत हिमानीची आई अलका संजय भंडारे (वय 53 रा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महसूलमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

पती विरेंद्र अशोकराव शेकटकर, सासरे अशोकराव शेकटकर, सासु सुरेखा अशोकराव शेकटकर (तिघे रा. चितळे रोड, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. हिमानीचा विवाह मे, 2012 मध्ये वीरेंद्र शेकटकरसोबत झाला होता. पती, सासरे आशोकराव शेकटकर, सासु सुरेखा आशोकराव शेकटकर, दिर निरज आशोकराव शेकटकर असे एकत्र कुटुंबासह एकत्र राहत होते.

मे, 2012 पासुन पुढे दोन वर्षे फिर्यादीच्या मुलीच्या सासरच्या लोकांनी मुलीला व्यवस्थित नांदवले त्यानंतर पतीसह सासु सासरे तिला सतत शारीरीक व मानसिक त्रास देवुन‘तु आमची बदनामी करते असे म्हणुन सतत उपासी पोटी ठेवून छळ करू लागले’, याबाबत हिमानी वेळोवेळी तिच्या आई-वडिलांना सांगत असे.

प्रवाशी बसचा भीषण अपघात, १९ ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

16 मार्च, 2023 रोजी हिमानीने तिचा भाऊ हिमांशु संजय भंडारे यांना फोन करून,‘माझे सासरचे लोक खुप त्रास देतात, मला येथे राहवयाचे नाही. तु मला आताच्या आता नगरला घेऊन जा’, असा फोन केला होता. दरम्यान हिमानीने 17 मार्च, 2023 रोजी सकाळी घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

राहुल गांधींच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस, काय आहे प्रकरण?

- Advertisment -

ताज्या बातम्या