Friday, May 3, 2024
Homeनगरट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये घुसून महिलेला धक्काबुकी

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये घुसून महिलेला धक्काबुकी

अहमदनगर (प्रतिनिधी)

‘तु येथे काम करू नकोस, असे म्हणून एका ट्रॅव्हल्स ऑफीसमधील महिला कर्मचार्‍यास पाच जणांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना गुरूवारी (दि. 6) सायंकाळी पाचच्या सुमारास माळीवाडा येथील ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑफीसमध्ये घडली.

- Advertisement -

या घटनेप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून रूपा चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही), करण चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. कोंंबडीवाला मळा, सोलापूर रस्ता) व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूवारी सकाळी 10 वाजता फिर्यादी ऑफीसमध्ये काम करत असताना त्यांच्या मोबाईलवर रूपा चव्हाण हिने फोन करून,‘तुला भेटायचे आहे, तु तेथे काम कसे करते, तेच बघते’, असे म्हणाली. यासंदर्भात चव्हाण हिच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर फिर्यादी ऑफीसमध्ये काम करत असताना सायंकाळी पाच वाजता रूपा चव्हाण तिचा मुलगा करण चव्हाण व त्यांचे तीन साथीदार तेथे आले.

रूपा चव्हाण हिने,‘तु येथे काम करू नकोस’, असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर चव्हाण हिने हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली. करण चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी तुला पाहुन घेतो असे म्हणून धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या