Friday, May 3, 2024
Homeनगरविश्व हिंदू परिषदेची सतर्कता : कत्तलीसाठी जाणार्‍या 23 जनावरांची सुटका

विश्व हिंदू परिषदेची सतर्कता : कत्तलीसाठी जाणार्‍या 23 जनावरांची सुटका

अहमदनगर|Ahmedagar

विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) पदाधिकार्‍यांनी पिकअपमधून (Pickup) कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या एक गाय व 22 वासरांची सुटका केली. तो पिकअप (एमएच 14 एझेड 4810) तोफखाना पोलिसांच्या (Tofhkhana Police) ताब्यात देण्यात आला आहे.

- Advertisement -

चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; झेप चुकल्याने दोघे बचावले

रविवारी (Sunday) रात्री नगर-कल्याण रोडवर (Nagar-Kalyan Road) जुन्या जकात नाक्याजवळ ही कारवाई केली. विश्व हिंदू परिषदेचे नगर शहर प्रमुख दीपक रामराव वांढेकर (वय 33 रा. नेप्तीनाका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरबाज लतिफ शेख (वय 24), साकिब सलिम कुरेशी (वय 19 दोघे रा. बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

एका पिकअपमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती वांढेकर यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना माहिती दिली. अधीक्षक पाटील यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांसोबत दिले.

नगर-कल्याण रोडवरील जुन्या जकात नाक्याजवळ सदरचा पिकअप पकडला. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक गाय व 22 वासरे मिळून आली. तो पिकअप तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या