Thursday, January 8, 2026
HomeनगरAhmednagar Crime News : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar Crime News : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर | प्रतिनिधी

चारचाकी वाहन पार्किंगच्या वादातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना गुरूवारी (19 सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कायनेटीक चौकातील एका वडापाव हॉटेल समोर घडली.

- Advertisement -

या प्रकरणी पीडित महिलेने रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात एक जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत नंदु वनवे ऊर्फ पिनु (रा. आंबेडकर उद्यानाचे समोर, कायनेटीक चौक) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

YouTube video player

श्रीकांत याने त्याचे चारचाकी वाहन गुरूवारी सायंकाळी कायनेटीक चौकातील वडापाव हॉटेल समोर पार्क केले होते. त्यावेळी फिर्यादी त्याला म्हणाल्या ‘तुझी गाडी हॉटेलच्या पुढे घे किंवा मागे घे गिर्‍हाईकास येण्या जाण्यास अडचण होत आहे’ असे म्हणताच श्रीकांतला राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे हि वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक, मध्येच सुरू झाला भलताच व्हिडीओ

दरम्यान, सदरची घटना घडल्यानंतर पीडिताने कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीकांंत वनवे विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार एस. एस. डाके करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...