Sunday, May 19, 2024
Homeनगरनगर, दौंड, बारामती रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

नगर, दौंड, बारामती रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 1275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे, यात महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकं, तर मुंबईतील 32 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात मुंबई लोकलनं होते, मध्य रेल्वेचच सांगायचं झालं तर दिवसाला 40 लाखाहून अधिक प्रवासी या लाईफलाईननं प्रवास करतात. मुंबईसोबत महाराष्ट्रातील अनेक जंक्शनही गजबजलेली असतात, कुठेही गेलं तरी रेल्वे स्थानकावर आणि स्थानकाबाहेरील गर्दीपासून काही सुटका नाही.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेमार्फत महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांचं रूप पालटणार आहे. रेल्वे परिसरात रिक्षा, टॅक्सी, बससारख्या वाहनांसाठी योग्य नियोजन करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकांना जोडूनच काही इमारती, घरं आहेत, त्यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत आणि लवकरच या स्थानकांबाहेरील परिसरात काही बदल केलेले दिसणार आहेत.

या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं केली जाणारे. रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर व्हावा,सर्व सुविधा असलेली प्रतीक्षालयं, चांगल्या दर्जाची शौचालयं, गरजेनुसार लिफ्ट, एस्केलेटर, फ्री ुळषळ, वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेअंतर्गत खाऊ, वृत्तपत्र, पुस्तकांच्या विक्रीसाठी लहान स्टॉल्स,आवश्यकतेनुसार रूफ प्लाझा आणि दिव्यांगांच्या दृष्टीनं काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. इतकंच नाही तर उत्कृष्ट दर्जाची विश्रामगृह, बिझनेस मीटिंग्ससाठी विशेष जागा अशा सर्व सुविधा प्रत्येक रेल्वे स्थानकावर देण्यात येणार आहेत. स्थानकांच्या छतांची नव्याने बांधणी, नवी तिकीट खिडक्या, स्थानकात येण्या-जाण्यासाठीच्या जागांचं सुद्धा नियोजन करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे किंवा मग हार्बर रेल्वे असो, मुंबईतल्या सर्व स्थानकांवरील शौचालयांची अवस्था अतिशय वाईट आहे, पुरुष शौचालयाचा वापर काही प्रमाणात करतात मात्र महिला या दुर्गंधी, अस्वच्छ शौचालयात कितीही गरज पडली तरी शौचालयाकडे फिरकत नाहीत, रेल्वेनं वेळोवेळी याची देखभाल, स्वच्छता करायला हवी अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येतेय. नव्या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या मागण्यांची पूर्तता नक्कीच होईल.

अहमदनगर, गोंदिया, बारामती, भंडारा रोड, भुसावळ, ठाणे, हुजूर साहिब नांदेड, दौंड, देहू रोड, हिंगोली, इगतपुरी, लातूर यासह महाराष्ट्रातील एकूण 123 स्थानकांचं रूप पालटणार आहे, तर मुंबईत वांद्रे टर्मिनस, चर्नी रोड, दिवा, कल्याण, जोगेश्वरी, दादर, माटुंगा, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा एकूण 32 रेल्वे स्थानकांवर याच महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील 32 तर एकूण महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांवर एप्रिल महिन्यातच कामाला सुरुवात होणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या आरामदायी आणि सुकर प्रवासासाठी रेल्वेचं पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या