Thursday, May 2, 2024
Homeनगर435 करोना पॉझिटिव्ह

435 करोना पॉझिटिव्ह

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा सुरू असलेला हाहाकार थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. सोमवारी पुन्हा 435 करोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. यात जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 43, अँटीजेन चाचणीत 194 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 198 रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 243 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 346 झाली असून उपचार होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 25 आहे.

सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये सकाळी 43 रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 28, संगमनेर 2, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 3, कॅन्टोन्मेंट 3, पारनेर 3, शेवगाव 1, कोपरगाव 1 आणि जामखेड येथील 1 रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील 39 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले. तर जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 194 जण बाधित आढळुन आले.

यामध्ये, मनपा 54, संगमनेर 12, राहाता 21, नगर ग्रामीण 8, नेवासा 8, श्रीगोंदा 17, पारनेर 8, शेवगाव 29, कोपरगाव 26, जामखेड 6 आणि कर्जत 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 198 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 164, संगमनेर 8, राहाता 1, पाथर्डी 7, नगर ग्रामीण 6, श्रीरामपूर 1, पारनेर 2 अकोले 1, राहुरी 1, शेवगाव 1, कोपरगाव 1 आणि कर्जत येथील 5 रुग्णांचा समावेश आहे.

सोमवारी सकाळी जिल्ह्यात 263 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 4 हजा 25 इतकी झाली आहे. काल घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये मनपा 113, संगमनेर 55, राहाता 10, पाथर्डी 18, नगर ग्रामीण 3, श्रीरामपूर 8, भिंगार कॅन्टोन्मेंट 3, नेवासा 4, श्रीगोंदा 5, अकोले 18, राहुरी 2, कोपरगाव 7, जामखेड 1, कर्जत 11, इतर जिल्हा 5 यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या