Tuesday, March 25, 2025
Homeनगरजिल्ह्यात 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळावे

जिल्ह्यात 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्येकी दोन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जागेवरच निवड होणार्‍या संधीचा लाभ अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे.

- Advertisement -

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर येथे पहिला मेळावा 20 सप्टेंबर रोजी तर 26 सप्टेंबर रोजी दुसरा मेळावा होणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राहाता येथे 20 सप्टेंबर व 27 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राहुरी येथे 20 सप्टेंबर व 25 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेवासा येथे 20 सप्टेंबर व 24 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे 20 सप्टेंबर व 27 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड येथे 20 सप्टेंबर व 26 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीगोंदा येथे 20 सप्टेंबर व 27 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोपरगाव येथे 21 सप्टेंबर व 25 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथर्डी येथे 21 सप्टेंबर व 26 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत येथे 21 सप्टेंबर व 27 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पारनेर येथे 21 सप्टेंबर व 27 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथे 21 सप्टेंबर व 26 सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीरामपूर येथे 23 सप्टेंबर व 30 सप्टेंबर तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर येथे पहिला मेळावा 25 सप्टेंबर 2024 व दुसरा रोजगार मेळावा 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.

या रोजगार मेळाव्यासाठी उत्पादक संस्था, कृषी क्षेत्र, बँकींग, अन्न प्रक्रिया, आरोग्य, आदरतिथ्य या क्षेत्रातील नामांकित औद्योगिक आस्थापना सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत. इच्छुक दहावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रासहित पात्रतेनुसार प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व प्रत्यक्ष निवडीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...