Sunday, May 19, 2024
Homeनगरशुक्रवारपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट

शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, नगर जिल्ह्यातही 23 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, नगर जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. नगर, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली, अकोले, संगमनेर, राहात्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दवणगावातील हुकेल गट नामक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसानं सोयाबीन, कापूस, मका ही पिकं धोक्यात आली आहेत, तर सर्वसामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे.

दरम्यान, खरीप हंगामाची पेरणी अहवाल कृषी विभागाने अंतिम केला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या 115 टक्के पाऊस झालेला असून खरीप हंगामात 6 लाख 40 हजार हेक्टवर पेरण्या झालेल्या आहेत. अधिकच्या पावसाचा फटका आता माणसांसोबत पिकांना बसतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी कपाशी आणि मकावर रोगाचा प्रार्दुभाव झालेला आहे. यात राहाता, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यात कपाशी पिकावर आणि मका पिकावर श्रीरामपूर आणि पारनेर पिकांवर तुडतुड्या, बोंडअळी आणि नवीन अमेरिकन लष्कारी अळीचा विळखा पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत पडणार्‍या पावसामुळे खरीप हंगामात बहरलेली पिके आता सडण्याच्या मार्गावर आहे. यात प्रमुख्याने निगदी पिकांचा समावेश असणार्‍या पिकांवर रोगाचा प्रार्दुभाव झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसत आहे. जिल्ह्यात 1 लाख 31 हजार 962 हेक्टवर कपाशी लागवड झालेली आहे. सरासरीच्या 108 टक्के अधिक क्षेत्रावर ही लागवड आहे. तर मका पिकांची पेरणी शेतकर्‍यांनी 69 हजार 300 हेक्टरवर केली असून सरासरीच्या तुलनेत ही लागवड 114 टक्के आहे.

मात्र, आता पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव वाढला असून यामुळे पिकांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. कपाशी पिकावर राहाता तालुक्यात तुडतुड्या आणि बोंडअळीचा हल्ला झाला असून सोयाबीन पिकाची नगर आणि राहुरी तालुक्यात कृषी विभागाकडून पाहणी सुरू आहे. तर श्रीरामपूर आणि पारनेर तालुक्यात मका पिकांवर मोठ्या प्रमाणात नवीन अमेरिकन लष्कारी अळीचा हल्ला सुरू आहे. यामुळे या पिकांच्या उत्पादनावर त्याचा प्रभाव पडणार आहे.

अन्य पिकांची स्थिती

जिल्ह्यात 82 हजार 228 हेक्टवर चारा पिकांची पेरणी झालेली आहे. सततच्या पावसामुळे नवीन कांदा लागवडीचे प्रमाण कमी असून आतापर्यंत 100 हेक्टरवर कांदा लागवड झालेली आहे. भाजीपाला पिकांची लागवडी कमी असून यामुळे बाजारात भाज्याचे भाव कडालेले आहे. सध्या 226 हेक्टरवर भाजीपाला पिक आहे. नवीन ऊस लागवडीचे प्रमाण चांगले असून आतापर्यंत जिल्ह्यात 61 हजार 418 हेक्टरवर ऊसाची लागवड झालेली आहे.

सीना नदीला पूर

डोंगरगण तसेच पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने काल मंगळवारी सिना नदीला पूर आला होता.पाणीपातळी वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या