Friday, November 15, 2024
Homeनगरअहमदनगर महापालिका आयुक्तपदी देवीदास पवार

अहमदनगर महापालिका आयुक्तपदी देवीदास पवार

डॉ. जावळेंची कार्यमुक्ती अनुत्तरीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे (Ahmednagar Municipal Commissioner Dr. Pankaj Jawale) लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्या जागी देवीदास पवार (Devidas Pawar) यांची आयुक्त (Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, डॉ. जावळे यांना कार्यमुक्त केले की नाही वा त्यांच्यावर काही प्रशासकीय कारवाई केली की नाही, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यासंदर्भात कोणताही शासन आदेश महापालिकेला आलेला नाही. बांधकाम व्यावसायिकास लाच (Bribe) मागितल्याचा गुन्हा डॉ. जावळेंवर दाखल झाला आहे. तेव्हापासून म्हणजे सुमारे 8 ते 10 दिवसांपासून कार्यालयात आलेले नाहीत. त्यामुळे मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने देवीदास पवार (Devidas Pawar) यांची नवे आयुक्त म्हणून येथे नियुक्ती केली आहे. पण डॉ. जावळेंवरील कारवाईबाबत कोणताही आदेश शासनाने जारी केलेला नाही.

- Advertisement -

नांदेडचे रहिवासी
देवीदास पवार अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत होते. नगर विकास विभागाने त्यांची अहमदनगर मनपा आयुक्तपदी बदलीचा आदेश दिला आहे. आयुक्त पवार यांनी परळी, लातूर, विरार, यवतमाळ, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे मुख्याधिकारी तसेच परभणी व जळगाव येथे महापालिका आयुक्त आणि अमरावती येथे अतिरिक्त आयुक्त या पदांवर काम केले आहे. त्यांची तब्बल 22 वर्षे प्रशासकीय सेवा झाली आहे. मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले पवार यांनी 1996 मध्ये परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रशासकीय सेवेची सुरवात केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या