Saturday, November 16, 2024
Homeनगरगणेशोत्सवात होणार्‍या गुरूजींच्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष

गणेशोत्सवात होणार्‍या गुरूजींच्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष

अहमदनगर | प्रतिनिधी

यंदाची प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा ऐन गणेशोत्सवादरम्यान रविवारी होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गुरुमाऊली मंडळातील फुटीनंतर पहिल्यांदा शिक्षक बँकेची सभा होणार असून यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ही सभा यंदा गाजणार की गुंडाळणार असा प्रश्‍न गणेशभक्तांसह जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना आहे. दरम्यान, सभेत विषय पत्रिकेत मयत ठेवीमध्ये वाढ करण्यासह बँकेत आयटी तज्ञाच्या नेमणुकीचा विषय आहे. या विषयावर काय होणार याकडे जिल्ह्यातील 12 हजार शिक्षकांचे लक्ष राहणार आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 105 वी सर्वसाधारण सभा रविवारी नगरजवळ होत आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात शिक्षक बँकेला 8 कोटी 63 लाखांचा नफा झाला असून सभासदांना 7 टक्के प्रमाणे लाभांश देण्याची शिफारस सर्वसाधारण सभेसमोर ठेवली आहे.

हे ही वाचा : संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…

शिक्षक बँकेच्या ठेवी 1 हजार 500 कोटीच्या दरम्यान ठेवी असून 1100 कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. गेल्या आठ वर्षापासून सभासद हिताचा बँकेत कारभार सुरू असून, तो यापुढे सुरू राहील, अशी ग्वाही शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी दिली. शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिक्षक नेते सुरेश निवडुंगे, राजकुमार साळवे, साहेबराव अनाप, विद्याताई आढाव, अर्जुन शिरसाठ, बाबा खरात, आर. टी. साबळे, राजू राहणे, किसन खेमनर, बाळासाहेब मुखेकर, राम वाकचौरे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश गोरे यांनी सभासद कल्याण निधीमधून सभासदांच्या पाल्यांना पारितोषिके व आजारी सभासदांना पंचवीस हजार रुपयेपर्यंत वैद्यकीय मदत केली असून सभासदांचा वाढलेला मृत्युदर व वाढलेली कर्ज मर्यादा यामुळे सभासदांचा कर्ज निवारण निधी सध्या शिल्लक नाही.

हे ही वाचा : आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याचा मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाचा मृत्यू

हा निधी वाढवण्यासाठी विना परतावा एक हजार रुपये ठेव घेण्याचा व कुटुंब आधारमधील पावणेदोन कोटींची रक्कम या निधीत वर्ग करण्याचा पोटनियम दुरुस्तीसाठी ठेवला असून नगर व जामखेड कार्यालयासाठी स्व मालकीची जागाबाबत शिफारस मंजुरीसाठी ठेवली आहे. जिल्ह्यातील मंडळाच्या व संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व सभासदांच्या बहुमतानेच सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केले जातील, सर्व सभासदांना बोलण्याची संधी दिली जाईल, असे आश्‍वासित केले.

यावेळी संचालक सर्वश्री कैलास सारोक्ते, अण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहिंज, शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, माणिक कदम, सूर्यकांत काळे, संतोषकुमार राऊत, ज्ञानेश्‍वर शिरसाठ, शिवाजी कराड, दिनेश खोसे, विठ्ठल फुंदे, सुनील गायकवाड, अरविंद शिर्के, अशोक गुरव, सुनील मते, उषा येणारे, वसंत कर्डिले आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या