Saturday, November 16, 2024
HomeनगरAhmednagar Accident : पांढरी पुलावर ८ तासात तीन अपघात; चार जखमी

Ahmednagar Accident : पांढरी पुलावर ८ तासात तीन अपघात; चार जखमी

गणेशवाडी | वार्ताहर

अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पुल येथे दि. (१४ सप्टेंबर) रोजी रात्री १२.३० ते सकाळी ८ वाजे दरम्यान तीन अपघात झाले आहे. यामध्ये चार जण जखमी झाले. रात्री अपघात झाल्याने सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात रात्री १२.३० वाजता झाला. चेन्नई येथून माल घेऊन गुजरातला निघालेल्या गाडीवरील (टिएन ५२ एच २०४६) चालकाचे नियंत्रण सुटल्याने जवळीलच एका नव्यानेच सुरू झाल्याने हार्डवेअरच्या दुकानात घुसला. त्यामध्ये सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले.

हे ही वाचा : खळबळजनक! बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून मेहुण्याच्या ३ वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करून हत्या

दुसरा अपघात पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान (एमएच १६ सिसि २६२७) क्रमांकाची ट्रक मुंबईहून अहमदनगर मार्गे संभाजीनगरकडे जात असताना घाटात ब्रेक नादुरुस्त झाले. समोर चालू असलेले भाजीपाला घेऊन चाललेल्या टेम्पोला मागिल बाजुन धडक दिली. त्यातच पुढे तामिळनाडू येथील अपघातग्रस्त ट्रक दिसून न आल्याने त्यावरती जावुन आदळला. तिसरा अपघात सकाळी आठ वाजेच्या दरम्यान झाला असून समोरचे अपघातग्रस्त वाहन दिसून न आल्याने ट्रक (आरजे ११ जिबि ८३३२) त्यावरती जाऊन आदळले.

दरम्यान या ठिकाणी दर आठ दिवसाला एक तरी अपघात होत असतो. वांजुळी, खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, उदरमल, आव्हाडवाडी, ईमामपुर ग्रामपंचायत यांचे वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास ठराव देणार आहे. या पुर्वी देखील अनेक वेळा संबंधित बांधकाम विभागास ठराव देवुन सुध्दा कुठल्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हे ही वाचा : १० वर्षांनी पाळणा हलला, बारसे करून पुण्याला निघाले अन्…; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे ४ हकनाक बळी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या