Monday, October 14, 2024
HomeनगरCrime News : खळबळजनक! बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून मेहुण्याच्या ३ वर्षांच्या...

Crime News : खळबळजनक! बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून मेहुण्याच्या ३ वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करून हत्या

वैजापूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील एका तीन वर्षीय बालकाचा खून करून त्याचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील गारज परिसरात अखेर सात दिवसांनंतर सापडला.

- Advertisement -

स्नेहदीप त्रिभुवन असे खून झालेल्या बालकाचे नाव असून आरोपी राहुल पोपट बोधक (वय ३०, रा. चांदेगाव ता. वैजापूर) याने बायकोला नांदायला पाठवत नसल्याचा राग मनात धरून मेहुण्याच्या तीन वर्षीय बालकाचे शनिवारी (दि.८) अपहरण करून नशेत गारज परिसरात स्नेहदीपचा खून केला व मृतदेह मक्याच्या शेतात फेकून दिला होता.

या मुलाचा खून करून त्यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात फेकल्याची माहिती शिऊर पोलिसांना रविवारी (दि.९) रोजी मिळाल्यानंतर विरगाव पोलिसांच्या मदतीने श्रीरामपूर पोलीसांनी श्वानपथकाला सोबत घेऊन परिसर पिंजुन काढला होता. परंतु पोलीसांना मृतदेहाचा शोध लागला नव्हता.

हे ही वाचा : शंभरहून अधिक युवकांना लष्करात भरतीचे आमिष; बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारले

अखेर सात दिवसांनंतर शुक्रवारी (दि.१३) रोजी गारज परीसरातील कचरु सयाजी तुपे यांच्या संभाजीनगर मुंबई महामार्गालगत असलेल्या गट नंबर ६७ मधील मक्याच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी शिऊर पोलीसांना याबाबत माहिती दिली. ते शेतात मक्याच्या शेजारी भेंडी तोडत असताना त्यांना त्यांना मृतदेहाचा सडलेला दुर्गंधी येत असल्याने त्यांनी मक्याच्या शेतात जाऊन पाहिले असता त्यांना लहान बालकाचा शिर नसलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

स्नेहदीप त्रिभुवन असे खून झालेल्या बालकाचे नाव असून आरोपी राहुल पोपट बोधक (वय ३०, रा. चांदेगाव ता. वैजापूर) याने बायकोला नांदायला पाठवत नसल्याने राग मनात धरून मेहुण्याच्या तीन वर्षीय बालकाचे शनिवारी (दि.८) रोजी अपहरण करून नशेत गारज परिसरात स्नेहदीपचा खून करून मृतदेह मक्याच्या शेतात फेकून दिला होता.

हे ही वाचा : जिल्हा सहकार बँकेचे पाय खोलात?

याबाबत शेतकरी कचरु सयाजी तुपे हे शुक्रवारी शेतात काम करत असताना दुपारी दोन वाजता त्यांना मृतदेह आढळला त्यांनी शिऊर पोलीसांना माहिती दिली. शिऊर पोलिसांनी श्रीरामपूर पोलीसांना कळविले. माहीती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी वैभव रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गणेश गोरक्ष यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून जागेवरच शवविच्छेदन करुन मृतदेह वडीलांच्या ताब्यात दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या