Friday, May 3, 2024
Homeनगरशंकर गोरे महापालिकेचे नवे आयुक्त

शंकर गोरे महापालिकेचे नवे आयुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिक्त असलेल्या अहमदनगर महापलिकेच्या आयुक्त पदी शंकर गोरे यांची निवुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने आज शुक्रवारी गोरे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

गोरे हे चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय कारणास्तव गोरे यांची चाळीसगावहून नगर महापालिकेच आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार रिटायर झाल्यानंतर कलेक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे आयुक्त पदाचा प्रभारी पद्भार होता. आता आयुक्त म्हणून गोरे यांची नियुक्ती झाली आहे.

  • बिगरअनुभवी… नाराजी

  • नगरला आयुक्त म्हणून लाभलेले आयुक्त शंकर गोरे यांना उपायुक्त पदाचही अनुभव नाही. असे बिगरअनुभवी अधिकारी देऊन नगरकरांचे काय भले होणार? असा प्रश्न करत गोरे यांच्या नियुक्तीवर स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या