Monday, May 6, 2024
Homeदेश विदेश...अखेर एअर इंडिया अधिकृतरित्या टाटांच्या स्वाधीन

…अखेर एअर इंडिया अधिकृतरित्या टाटांच्या स्वाधीन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

एअर इंडियाची (Air India) मालकी हस्तांतरण प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. केंद्र सरकार (Central Government) आणि टाटा (TATA) समूह यांच्यात झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर पूर्णपणे टाटांची मालकी प्रस्थापित झाली आहे….

- Advertisement -

आज सकाळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यानंतर मालकी हस्तांतरण प्रक्रियेचा मुहूर्त चुकल्याचीदेखील चर्चा रंगली.

आज ही प्रक्रिया पूर्ण होणार नसून आता उद्या होणार असल्याचे सांगितले गेले होते. आता याबाबत केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. एअर इंडिया अधिकृतरित्या टाटांच्या स्वाधीन झाली आहे.

शरद पवारांची मान शरमेने खाली जाईल अशी कृती…; उपमुख्यमंत्र्यांनी मालेगावच्या नगरसेवकांचे टोचले कान

एअर इंडिया कर्जबाजारी झाल्यानंतर केंद्र सरकारने एअर इंडियामधून १०० टक्के निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला. टाटा सन्सने यासाठी लावलेली १८ हजार कोटींची बोली अखेर अंतिम करण्यात आली. मात्र, यावेळी एअर इंडियावर तब्बल १५ हजार ३०० कोटींचे कर्ज होते.

या कर्जाची रक्कम वगळता उरलेले २ हजार ७०० कोटी रुपये रोख स्वरूपात केंद्र सरकारला अदा करण्याचे टाटा सन्सने मान्य केले होते. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman), व्यापारमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी एअर इंडियाच्या व्यवहारास ४ ऑक्टोबरला मंजुरी दिली होती.

मालेगावमधील पक्षप्रवेशावरून नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला इशारा; म्हणाले…

यानुसार एअर इंडियाकडून विविध टप्प्यांमध्ये २७०० कोटींही ही रक्कम सरकारला अदा करण्यात आली असून केंद्र सरकारने देखील आपले १०० टक्के शेअर्स टाटा सन्स (Tata Sons) आणि भागीदार कंपनी असलेल्या टेलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडे हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे आज अखेर एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या