Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"अजित पवारांशी युती म्हणजे असंगाशी संग"; भाजप नेत्याच्या विधानामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या?

“अजित पवारांशी युती म्हणजे असंगाशी संग”; भाजप नेत्याच्या विधानामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या?

मुंबई | mumbai
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यात राजकीय वातावारण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील दोन प्रमुख आघाड्यांमध्ये जागावाटप असो किंवा राजकीय कार्यक्रम यामधून जोरदार टीकाटिप्पणी चालू आहे. अशातच आता महायुतीतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्दैवी असून हा असंगाशी संग असल्याचे विधान आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हाके काय म्हणाले?
दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केलाय.यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेय. दुर्देवाने आमच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती ना आम्हाला पटली, ना आम्हाला पटली,असे ते म्हणाले. “पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते, नगरसेवक बसत होते. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का?” असा सवाल गणेश हाके यांनी उपस्थित केला.

एकीकडे तानाजी सावंत यांच्या विधानाने राष्ट्रवादीचे नेते संतापले असून मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीच्या युतीवर नाराजी व्यक्त केल्याने नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या