Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar Death : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? बारामतीत प्रत्यक्षदर्शीने सांगितली...

Ajit Pawar Death : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? बारामतीत प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना

बारामती | Baramati

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामती विमानतळावर आज (बुधवारी)सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांचे विमान बारामती एमआयडीसीतील विमानतळावर उतरत असताना कोसळले. त्यानंतर या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? हे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

YouTube video player

यावेळी प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अजित पवारांचे विमान (Plane) पहिल्यांदा वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं. आधी हे विमान धावपट्टीवर उतरत असल्याचं आम्हाला वाटलं, पण नंतर ते कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. विमान कोसळल्याचं लक्षात येताच आजूबाजूचे अनेक लोक आले. या लोकांनी मदतीचा प्रयत्न केला, पण आग इतकी मोठी होती की कोणीही मदत करू शकलं नाही. आम्ही आमच्या वेदनाही सांगू शकत नाही. ट्रॅकपासून जवळपास १०० फूट अंतरावर असताना हे विमान कोसळलं,” अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान,जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये (Baramati) अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य सहाजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू (Death) झाला.

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा...