Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar Death : ... अन् 'त्याच' घड्याळामुळे पटली अजित पवारांच्या मृतदेहाची...

Ajit Pawar Death : … अन् ‘त्याच’ घड्याळामुळे पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख; महाराष्ट्राच्या ‘दादा’ची चटका लावणारी एक्झिट

बारामती | Baramati

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी आज (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यात देखील तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे विमानाने निघाले होते. मात्र, बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर लँडिंगदरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

YouTube video player

आजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती (Baramati) विमानतळापासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. विमानतळापासून पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं आणि विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. यानंतर संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले होते.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मिळालेल्या माहितीनुसार हा विमान अपघात (Plane Accident) एवढा भीषण होता की, या विमानातील सर्व वस्तू जळून खाक झाले. त्यामुळे अजित पवारांची ओळख पटणे देखील अवघड झाले होते. मात्र, अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख ही त्यांच्या हातात असलेले घड्याळ, त्यांनी घातलेला चष्मा आणि जॅकेटमुळे पटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर सर्व मृतदेह झाकण्यासाठी स्थानिकांनी ब्लँकेट पोलीस आणि मदतकार्य करणाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले.

हे देखील वाचा : Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

अन् घड्याळामुळेच पटली अजितदादांची ओळख

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे राहिले होते. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेले होते. सध्या सुनावणीसाठी हे प्रकरण अंतिम टप्प्यात असून, त्याच्यावर लवकरच निर्णय होणार आहे. मात्र, आज याच घड्याळाच्या चिन्हामुळे अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटली.

हे देखील वाचा : Ajit Pawar Political Journey : सहकारातून कारकि‍र्दीला सुरुवात ते खासदार, आमदार आणि उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम; अशी होती अजित पवारांची राजकीय वाटचाल

ताज्या बातम्या