Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यामिमिक्री करणं राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

मिमिक्री करणं राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

मुंबई | Mumbai

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री करत टीका केली होती. काल (शनिवार) राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे सभा घेतली यावेळी त्यांनी अनेक मुद्य्यांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केले. यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण जनतेने त्यांना नाकारलं आहे. त्यांनी मागे एकदा निवडणुकीत १४ आमदार निवडून आणले. दुसऱ्यांदा फक्त एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरदराव सोनावणेंनी त्यांचं तिकिट घेतलं म्हणून तेवढी एक पाटी लागली. नंतर आमचे कल्याणचे सहकारी निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत जे लोक होते त्यापैकी काही लोक सोडले तर सगळे त्यांच्यापासून दूर गेले आहेत.

शिर्डीत ६ हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका

राज ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी अजित पवारची मिमिक्री करणं आणि अजित पवारचं व्यंगचित्र काढणं यात त्यांना समाधान वाटतं आहे. यामधून राज ठाकरे समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

शरद पवार यांचा राजीनामा आणि घेतलेली माघार यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यात आता चर्चा करण्याचं काही कारण नाही. पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जे सांगायचं ते सांगितलंय. काल पवारसाहेब बारामतीतही माध्यमांशी बोलले आहेत. त्यांचं जे मत आहे तेच आमचंही मत आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

महाविकास आघाडी एकत्र होती. आता आहे आणि पुढेही राहणार. मविआसंदर्भातील आमची कामं सुरुच आहेत, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कर्नाटकात आहेत. निवडणूक प्रचारासाठी ते बंगळुरू दौऱ्यावर गेले आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काय करायचं मुख्यमंत्री कुठे गेले? काय करतात? मी त्यांच्या वॉचवर नाहीये.माझं माझं काम सुरु आहे. माझं काम मला करु द्या, असं अजित पवार म्हणालेत.

Samruddhi Mahamarg : शेतकऱ्याने ट्रॅक्टर आडवे करून रोखला ‘समृद्धी महामार्ग’… कारण काय?

राज ठाकरे काय म्हणाले होते?

माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची नुसती घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल? उद्या मला पण उर्मटपणे बोलेल. म्हणून पवारसाहेबांनी राजीनामा मागे घेतला असणार, असे राज ठाकरे म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या