Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजगुलाबी स्वप्न दाखवत नाही, तर प्रत्यक्षात काम करून अमलात आणतो : अजित...

गुलाबी स्वप्न दाखवत नाही, तर प्रत्यक्षात काम करून अमलात आणतो : अजित पवार

निफाड | प्रतिनिधी
नागपंचमी महत्त्वाचा सणाचा दिवस असूनही माझ्या लाडया बहिणींची उपस्थित बघून भारावलो आहे. म्हणूनच अजित पवार गुलाबी स्वप्न दाखवत नाही तर प्रत्यक्षात काम करून अमलात आणतो. म्हणूनच अजितदादा का वादा हा माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही चुनावी जुमला नसून ही योजना लाडया बहिणींसाठी कायमस्वरूपी योजना आहे. त्यामुळे विरोधकांच्या फेक निगेटिव्हला न फसता १९ ऑगस्ट रोजी साजरी होणार्‍या रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर १७ ऑगस्टपर्यंत ६००० कोटी रुपये दोन हप्त्याचे माझ्या लाडया बहिणींच्या बँक खात्यावर वर्ग होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा निफाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण, आमदार दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ९ ऑगस्ट १९४२ चले जाव ही घोषणा महात्मा गांधीनी दिला तो आजचा दिवस. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत अजित पवार यांनी शासनाच्या वतीने योजनासाठी राष्ट्रवादी पक्षाची साथ देत असताना कुठलीही योजना आणताना मी अभ्यास केल्याशिवाय योजना आणत नाही. ३५ वर्षापासून राजकारणात आहे. अनेक उन्हाळे, पावसाळी बघितली आहे. भावनिक बनू नका. भावनेपेक्षा विकासाला बघा. त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा.

अजित पवारचा शब्द आहे, तुमच्या आमदाराने चांगले काम केले म्हणून तुमच्याकडे आलो. भावाच्या नात्याने मला ओवाळले. १९ तारखेला नियमांमध्ये बसणार्‍या माय भगिनींचा ३६ जिल्ह्यातील चांदा ते बांदा पर्यंत योजनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. विरोधकांनी आरोप करू द्या आपण कामाच्या रूपातून आरोपाला उत्तर द्यायचे, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

ताकाला जायचे अन् गाडगे लपवायचे हा अजित पवारचा स्वभाव नाही. त्यामुळे काटकसर करून राज्य चालवायचे आहे. भविष्यात लाडकी बहीण योजना सुरू राहण्यासाठी महायुतीचे सरकार आले पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असाही चिमटा त्यांनी याप्रसंगी आपल्या भाषणात काढत राज्याची आर्थिक स्थिती, जीएसटी, स्थूल वस्तू उत्पादनामुळे चांगली असून महिलांचे सबलीकरण व सक्षम करण्यासाठीच हा सरकारचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निफाड तालुयाच्या विकासासाठी जवळपास पंधराशे कोटींचा निधी दिलीप बनकर यांच्या माध्यमातून दिला असल्याने काम करणार्‍या व्यक्तीच्या मागे उभे रहा, असे त्यांनी निफाडकारांना साथ घातली.

माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी मोठी योजना, बळीराजासाठी पाच वर्षांसाठी वीज मोफतचा निर्णय, तालुयातील विकासकामांसाठी त्यात दवाखाना, पोलीस ठाणे, रस्ते यासाठी निधी दिला. तसेच ड्रायपोर्टसाठी निधीची तरतुद झाली आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. नाशिक जिल्हा बॅक, निसाका, नांदुरमध्यमेश्वर वाढीव दरवाजे अशा प्रलंबित मागण्याही बनकर यांनी अजित पवारांसमोर मांडून तालुयाच्या दृष्टीने यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. तसेच पिंपळगाव बसवंत येथे कांदा, द्राक्ष, टोमॅटो साठी प्रयोगशाळासाठी लक्ष घालुन हा प्रश्न मार्गी लावावा, असे साकडे त्यांनी पवार यांना घातले.

मेळाव्यासाठी तालुकाभरातून महिलांनी लक्षणीय भर पावसातही गर्दी केली होती. याप्रसंगी नामको बँक अध्यक्ष सोनलाल भंडारी, अशोकराव बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, निफाड तालुका महिला अध्यक्ष सुनीता राजोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर, सुरेश खोडे, संपतराव विधाते, सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राजेंद्र शिदे, दिलीप कापसे, संजय कुशारे, गणेश बनकर, गणपत हाडपे आदींसह राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या