Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयराज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शिलेदार ठरला! कोअर कमिटीच्या बैठकीत 'या' नेत्याच्या नावावर एकमत

राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शिलेदार ठरला! कोअर कमिटीच्या बैठकीत ‘या’ नेत्याच्या नावावर एकमत

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्रातील दोन जागांसह नऊ राज्यांतील राज्यसभेच्या (Rajyasabha) रिक्त १२ जागांसाठी तीन सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक (By Election) घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नितीन पाटील हे उद्या म्हणजेच बुधवारी राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर त्याक्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”; देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी मिळण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसही या जागेसाठी आग्रही होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपाला (BJP) सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यावेळी आमदार पाटील यांनी लग्नाच्या निमित्ताने मौन बाळगताना कार्यकर्त्यांना संभ्रमावस्थेत ठेवले होते. मात्र, अजित पवारांनी जाहीर सभेतून नितीन पाटील यांना साताऱ्याची जागा निवडून आणल्यास खासदारकीचा शब्द दिला होता.त्यानंतर आता हा शब्द अजित पवार यांनी पूर्ण केल्याची चर्चा आहे.

हे देखील वाचा : Political Crisis : महायुतीतील राजकीय धुसफूस चव्हाट्यावर

दरम्यान, नितीन पाटील (Nitin Patil) हे माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव व आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांचे बंधू आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा मोठ्या नेत्यांनी त्यांना साथ दिली होती. त्यामध्ये लक्ष्मणराव पाटील यांचा समावेश होता. नितीन पाटील हे बोपेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असून ते दुसऱ्यांदा जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले आहेत. तसेच बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांना थेट अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी

कोण आहेत नितीन पाटील

नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Satara District Central Cooperative Bank) अध्यक्ष आहेत. सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवर उमेदवार देण्यावर चर्चा झाली. यावेळी नितीन पाटील यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...