Wednesday, January 7, 2026
Homeराजकीयअजित पवारांना मोठा धक्का; 'या' नेत्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार...

अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहेत. अनेक नेते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपली राजकीय वाटचाल निश्चित करतांना दिसत असून पक्षांतर करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना मोठा धक्का बसत आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : संपादकीय : २७ जुलै २०२४ – बीज अंकुरे पण कोणते?

YouTube video player

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीतील पाथरीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. तसेच शरद पवारांसोबत जात असल्याची माहितीही स्वतः बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून टी २० मालिका; कुणाला मिळणार संधी?

दरम्यान, बाबाजानी दुर्राणी २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१८ मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केले. यानंतर आता नुकतीच त्यांची विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपली आहे. त्यांनी पुन्हा अजित पवारांकडे विधान परिषदेचे तिकीट मागितले होते. पंरतु, पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळेच ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...