Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“अर्थखातं टिकेल की नाही, हे सांगता येत नाही”; अजित पवारांचे भुवया उंचावणारे...

“अर्थखातं टिकेल की नाही, हे सांगता येत नाही”; अजित पवारांचे भुवया उंचावणारे विधान

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. अमित शाह यांनी काल (२३ सप्टेंबर) मुंबईत लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं. अमित शहा यांच्या या दौऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.

- Advertisement -

अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या एका विधानाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. “आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार महायुतीत नाराज असल्याचं बोललं जात आहे.

‘भावी मुख्यमंत्र्यां’च्या यादीत वाढ! अजित पवार, सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही बॅनर झळकले

सहकारी संस्थांना अर्थबळ पुरवण्याबाबत अजित पवार म्हणाले, “टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चुका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत.”

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या