मुंबई | Mumbai
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी होऊन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात अनेक वरिष्ठ नेत्यांसह आमदारांचा (MLA) मोठा गट भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला असून यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. या बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटात दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
अशातच आता काही दिवसांपूर्वी नव्या संसदेत (New Parliament) सुरू झालेल्या अधिवेशनात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार (Praful Patel and Sharad Pawar) एकत्र आल्याचे समोर आले होते. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी स्व:ता शरद पवारांसोबतचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. यावरून आज माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, “मला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांच्या फोटोवर काहीही बोलायचे नाही. याचा फोटो त्याचा फोटो ते माझे काम नाही. तु्म्ही विकासाबद्दल मला विचारा. विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे आणि आमचे काम सुरू आहे. मी सातत्याने महाराष्ट्रात फिरताना प्रश्न सोडवण्यासाठी बैठका आणि आढावा घेत आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे असे अजित पवार यांनी म्हटले.
तसेच गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केलेल्या टीकेबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, “हा असं म्हटला, तो तसा म्हटला यावर मला बोलायचं नाही. सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि परंपराही नाही. आपण आपले काम करत रहायचे ” असे त्यांनी म्हटले.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘भावी मुख्यमंत्र्यां’च्या यादीत वाढ! अजित पवार, सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही बॅनर झळकले