Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : ...म्हणून मी 'सिल्व्हर ओक'वर गेलो; अजित पवारांनी सांगितलं नेमकं...

Ajit Pawar : …म्हणून मी ‘सिल्व्हर ओक’वर गेलो; अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज नाशकात (Nashik) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडत असून या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळीच ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवारांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashik Road Railway Station) आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानक ते शासकीय विश्रामगृहापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित होते. त्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. अजित पवारांनी ‘सिल्व्हर ओक’ला जाण्याचे कारणही स्पष्ट केले.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच नाशकात; पायी चालत केलं जोरदार शक्तिप्रदर्शन

ते म्हणाले की, अंतर्मनाची साद ऐकून सिल्वर ओकवर गेलो. राजकारण वेगळं मात्र परिवार वेगळा. काल काकींचे ऑपरेशन होते. त्यांच्या हाताला दुखापत झाली होती, काल दिवसभर माझे काम सुरू होते. यानंतर मी सुप्रिया सुळे यांना फोन केला. तर त्यांनी मला सिल्वर ओकवरच बोलावले. मला काकींना भेटायचे होते, म्हणून मी सिल्वर ओकवर गेलो होतो.

Ajit Pawar : अजित पवारांची नाशिक दौऱ्यात ‘मोदी स्टाईल’, ‘वंदे भारत ट्रेन’मध्ये प्रवाशांसोबत निवांत गप्पा आणि सेल्फी… पाहा VIDEO

यावेळी शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. सिल्वर ओकवर आमचे राजकारणावर कुठलेही बोलणे झालेले नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार वेगळा असतो. आम्हाला आजी, आजोबांनी हे शिकवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या