Friday, May 3, 2024
Homeनगरअजनुजमध्ये अतिक्रमण करणार्‍या शेतकर्‍यांना नोटीसा

अजनुजमध्ये अतिक्रमण करणार्‍या शेतकर्‍यांना नोटीसा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

अजनुज गावच्याहद्दीत भीमा नदीच्या पात्रातलगतच्या क्षेत्राचे उजनी धरणासाठी जमीन संपादित केल्या आहेत. मात्र अनेक शेतकर्‍यांनी या संपादित क्षेत्रात अतिक्रमण करून जमीन वहिवाट केली आहे. या अतिक्रमण करणार्‍या शेतकर्‍यांना भीमा उपसा सिंचन शाखाधिकारी यांनी नोटीस बजावल्या आहेत.

- Advertisement -

भीमा नदीच्या पात्रालगत असणार्‍या जमिनी उजनी जलाशयासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून याकडे शासनाचे लक्ष नसल्याने जमीनी संपादीत झालेल्या अनेक शेतकर्‍यांनीच आपआपल्या जमिनी पुन्हा वाहिती करून पिके घेण्याची सुरुवात केली आहे. नुकतेच भीमा उपसा सिंचन शाखेने अजनुज भागातील अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस बजावली असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटीस चिटकवली आहे.

नोटीस प्राप्तीच्या दिनांकापासून 14 दिवसात अतिक्रमण न हटवल्यास अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येइल भविष्यात होणार्‍या नुकसानीस हे कार्यालय रहाणार नाही.तसेच शासकीय जमीन वाटपाबाबत मुंबई उच्च न्यायालय येथे असलेल्या याचिकेवर निकाल अद्याप प्रलंबित आहे.त्यामुळे शासकीय जमीन भाडेपट्ट्याने घेण्याचे कोणीही त्या प्रकारचे दस्तऐवज अर्ज देउ नयेत. उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात अतिक्रमण करू नये नयेभविष्यात अतिक्रमण केल्यास नाविलाजाने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे नोटीस मध्ये म्हंटले आहे.

साडेसात कोटींचे काय केले

अजनुज, गावातील धरणग्रस्त शेतकरी असून संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात इतर ठिकाणी जमिनी दिलेल्या नाहीत. आमचे क्षेत्र धरणाच्या वरच्या भागास असल्यान त्या क्षेत्रामध्ये गुरांसाठी चारा पिके उन्हाळ्यात करता येणे शक्य होते, तसेच मुळ प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या संपादित क्षेत्रावर अन्य त्रयस्थ शेतकरी ऊस पिके घेतात व अतिक्रमण करतात. केवळ अजनुज मध्येच नोटीस दिल्या असून गाळपेरचे हक्क शेतकर्‍यांना द्यावेत, अशी मागणी संजय क्षीरसागर यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या