Friday, May 17, 2024
Homeधुळेअक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे (Akkalpada water supply scheme) काम प्रगतीपथावर (work in progress) असून येत्या दिवाळी पर्यंत धुळेकर नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे (Bharatiya Janata Party) दिलेला शब्द पुर्ण (Complete the given word) करण्यासाठी कटिबध्द आहोत असे प्रतिपादन खा.डॉ.सुभाष भामरे (MP Dr. Subhash Bhamre) यांनी केली.

- Advertisement -

आज अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या पाहणी प्रसंगी डॉ. भामरे हे बोलत होते. या पाहणी प्रसंगी महापौर प्रदीप कर्पे, भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त देविदास टेकाळे आदी उपस्थिती होते.

सदर योजनेचे काम गतीने व समाधानकारक सुरू असून यात जॅकवेलचे काम 90 टक्के पूर्णत्वास आले असून अक्कलपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम 80 टक्के पूर्ण झालेले आहे. तसेच अ‍ॅप्ररोच चॅनेल, अ‍ॅपरोच ब्रिज, जॅक विहिरचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पाइपलाईनच्या कामात आलेले सर्व अडथळे व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आले आहे. वितरण वाहिनीचे कामही 90 टक्के पूर्णत्वास आले आहे.

यात सहा ते सात शेतकर्‍यांच्या भूसंपादनाचे काम प्रलंबित असून याबाबत जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गांचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून निर्णय घेण्यात येणार आहे. सदर काम तातडीने करण्यात येणार आहे. एकूणच कामाची स्थिती समाधानकारक व गतीने करण्यात येत आहे. असे खा.भामरे यांनी सांगितले.

या संपूर्ण योजनेचे 85 टक्के काम पूर्णत्वास आले असून दिवाळी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत धुळेकर नागरिकांना या योजनेद्वारे नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले. पाहणी प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर अनिल नागमोते, स्थायी समिती सभापती शितल नवले, सभागृह नेता राजेश पवार, महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती आरती अरूण पवार, नगरसेवक अमोल मासुळे, अरूण पवार, दिनेश बागुल, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ.संगिता नांदूरकर,अभियंता कैलास शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री निकम, सहाय्यक अभियंता आर.सी.पाटील, मनपा कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, नरेंद्र बागुल व ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या