Friday, November 15, 2024
Homeनगरमंत्रांच्या आश्वासनानंतर कला शिक्षक आंदोलन मागे

मंत्रांच्या आश्वासनानंतर कला शिक्षक आंदोलन मागे

अकोले (प्रतिनिधी)-अखिल भारतीय किसान सभा, सिटू व डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास प्रकल्प राजुर (अकोले) येथे सुरू आसलेल्या आंदोलनाची रविवारी सातव्या दिवशी यशस्वी सांगता झाली.

शेतकरी नेते डॉ अजित नवले, आमदार किरण लहामटे व विनय सावंत यांनी प्रशासन व आंदोलकांमध्ये चर्चा घडवून आणत आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

- Advertisement -

पूर्वी काम केलेल्या कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना अन्यायकारकपणे डावलण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेला या आंदोलनामुळे स्थगिती देण्यात आली.

पेसा कायद्या अंतर्गत स्थानिकांना प्राधान्य देण्यासह अन्य अनेक बाबींचा समावेश असलेला प्रस्ताव यावेळी तयार करण्यात आला.

चार तास चाललेल्या बैठकीत तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावावर दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्री ना. के.सी.पडावी यांच्यासोबत बैठक घेऊन या संदर्भतील कायदेशीत व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन यावेळी आ.किरण लहामटे यांनी दिले.

प्रकल्प अधिकारी श्री ठुबे यांनी चर्चेत सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केले.

पेसा क्षेत्रातील स्थानिकांना व शासकीय आश्रमशाळा किंवा जि.प.शाळा येथे विना मानधन सेवा केलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन यावेळी प्रकल्पाधिकारी डॉ संतोष ठुबे यांनी आंदोलकांना दिले.

कॉम्रेड सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, विद्रोहीचे स्वप्नील धांडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या