Thursday, May 2, 2024
Homeनगरआमदार लहामटे यांच्या विरोधात राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आमदार लहामटे यांच्या विरोधात राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात खडकी येथील एका व्यक्तीला मारहाण केल्या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

खडकीचे ग्रामपंचायतीचे शिपाई रामदास बांडे यांचे तक्रारी वरून हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाला मारहाण होणे ही गंभीर बाब असल्याचे म्हंटले आहे.

पोलीसांनी आमदार लहामटे यांच्या दबावाखाली अदखलपात्र गुन्हा दाखल केला. वास्तविक दखलपात्र गुन्हा नोंदविणे आवश्यक होते. जो काही गुन्हा दाखल केला त्यावर ठाणे अंमलदार यांची स्वाक्षरी नाही.

याची चौकशी करण्यात यावी व ठाणे अमंलदार यांना बडतर्फ करावे. अशी मागणी आपण जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांचे कडे केली असल्याचे भांगरे यांनी सांगितले. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या बैठकीत एका कार्यकर्त्यांची व त्यांची चांगलीच खडाजंगी झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या