Thursday, May 2, 2024
Homeनगरअकोले पोलिसांचे अवैध धंद्यांवर छापे

अकोले पोलिसांचे अवैध धंद्यांवर छापे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले पोलिसांनी बुधवारी तिरट जुगार, अवैद्य वाळु ,दारु यावर छापा मारल्यानंतर आज गुरूवारी पुन्हा तालुक्यातील कोतुळ येथे कल्याण मटका खेळताना छापा मारून 22 हजार 200 रुपये मुद्देमालासह 11 जणांना ताब्यात घेतले तर टाहाकारी व निळवंडे येथे अवैद्य दारु विक्री करताना दोघांना 1800 रूपयांच्या मुद्देमालासह अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक महिती अशी की, सहाय्यक पोलिस निरीक्षक व अकोले पोलिस स्टेशनचे प्रभारी मिथुन घुगे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन त्याचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॅान्स्टेबल विठ्ठल शरमाळे व पथकाने गुरुवार दि 27 मे 2021 रोजी सायं 5:15 च्या दरम्यान कोतुळ येथील सार्वजनिक मुतारीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाण कोतुळ येथे हसन उस्मान अत्तार, रोहिदास भिमा कचरे, (कोतुळ), सुरेश विष्णू खंडवे, भाऊसाहेब भिमा मधे, पप्पु पिनाजी खंडवे, बारकु बाळु पारधी (पांगरी), संपत दगडु भुरके, सुधाकर महादु देशमुख, दिपक गुलाब लोखंडे, अकिल अबु अत्तार (रा. कोतुळ) हे कल्याण नावाचा मटका विनापरवाना बेकायदा पैसे देवून खेळताना व आरोपी नंदु भगवंता खरात (साठेनगर, कोतुळ) हा वरील इसमांकडुन पैसे घेऊन त्यांना आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या देवून कल्याण मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळविताना 22 हजार 200 रूपयांच्या रोख रक्कमेसह रंगेहात पकडून गु.र.न.179/2021 भा.द.वी.कलम मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.

तर गुरूवारी दुपारी तालुक्यातील टाहाकारी येथे घराच्या आडोशाला रामदास महादु जाधव (रा.टाहाकारी) हा इसम विनापरवाना बेकायदा स्वतःच्या फायद्यासाठी अवैद्यरीत्या दारु विक्री करताना व बाळगताना आढळुन आलेने व दुुसरी निळवंडे येथील आकाश बाळासाहेब अवचिते हा इसम बेेेकायदा विनापरवाना देेशी दारु विक्री करताना आढळुन आल्याने अश्या दोन अवैैद्य दारुचे भा.द.वी. मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुुुुन्हे दाखल करून देशी दारूच्या 17 व 13 बाटल्या अशा 1020 व 780 असे एकूण 1800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या