मुंबई । Mumbai
बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडीअक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
तसेच या चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडत असून युट्युबवर (youtube) अपलोड केल्यानंतर ट्रेलरला कमेंट बॉक्समध्ये चाहते जबरदस्त प्रतिक्रिया देत आहे. तर बॉक्स ऑफिसवर हंगामा करण्यासाठी अक्षय कुमारचा हा चित्रपट सज्ज झाला असून अक्षयचा बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज (Bachchan Pandey & Emperor Prithviraj) चित्रपट आपटल्यानंतर रक्षाबंधन बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या चित्रपटाची संपूर्ण कथा ही ४ बहिणी आणि एक भाऊ यांच्यावर आधारित असून हा एक कौटुंबिक चित्रपट (Family movies) आहे.आनंदराय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात अक्षय कुमारआणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांची प्रमुख भूमिका आहे. तर आंनदराय व अक्षय कुमार यांनी सुरुवातीला ‘अतरंगीरे’ (Atrangi Re) या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तर भूमी पेडणेकर व अक्षय कुमार यांनी यापूर्वी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ (Toilet Ek Prem Katha) या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
सलिल परांजपे, नाशिक