Saturday, October 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAkshay Shinde Encounter : मोठी बातमी! अक्षय शिंदेचा मृत्यू झालेल्या गाडीत काय...

Akshay Shinde Encounter : मोठी बातमी! अक्षय शिंदेचा मृत्यू झालेल्या गाडीत काय सापडले? फॉरेन्सिक टीमच्या तपासात मोठे अपडेट आले समोर

मुंबई | Mumbai
बदलापुरात शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काउंटर करण्यात आला. पोलिसांवर त्याने आधी हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी केलेल्या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला आहे. काल पहाटे ही घटना घडली. आज याबाबतची आणखी एक अपडेट आली आहे.

अक्षयचा एन्काऊंटर पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची पाहणी केली. त्यावेळी व्हॅनमध्ये पोलिसांना बंदुकीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. गाडीत बंदुकीच्या ४ रिकाम्या पुंगळ्या आढळल्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अक्षयने ३ गोळ्या झाडल्या तर एक गोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली होती. गाडीत दोन वेगवेगळे रक्ताचे नमुने सापडले आहेत. यात एक रक्ताचा नमुना अक्षय शिंदेचा तर दुसरा रक्ताचा नमुना सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

- Advertisement -

पोलीस व्हॅनमध्ये घडलेला घटनाक्रम
अक्षय शिंदेला पोलीस व्हॅनमधून तळोजा कारागृहातून ट्रान्झीट रिमांडमध्ये आणले जात होते. त्याच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या आरोप प्रकरणी चौकशीसाठी पोलीस त्याला नेत होते. तेव्हा पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेने सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात नीलेश मोरे जखमी झाले. व्हॅनमध्ये सोबत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षार्थ अक्षयवर गोळी झाडली. अक्षयच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.

घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन
सदर प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वरीष्ठ डीसीपी पराग मनेरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ज्या पोलिसांच्या गाडीत अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला त्याची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ठाणे पोलिस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेडग्राऊडमध्ये ठेवण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या